बातम्या

गोड पदार्थांतील गूळ, खोबरं खाण्याने आरोग्याला होणारे फायदे...

Health benefits of eating jaggery


By nisha patil - 9/19/2023 7:14:17 AM
Share This News:



१. पोटाच्या अनेक समस्यांसाठी गूळ खूपच फायदेशीर ठरतो. जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्याने पोटात गॅस तयार होत नाही. याशिवाय अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका होते.

२. शरीरातील ऊर्जा वाढवायची असेल किंवा आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत हवी असेल तर जेवणानंतर गूळ खाण्यास सुरुवात करावी.३. गूळ खाल्ल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात. कॅल्शियम, फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांमुळे गूळ हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

४. फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स यांचे प्रमाण देखील गुळामध्ये चांगले असते. त्यामुळे थकवा घालविण्यासाठी गूळ अतिशय उपयुक्त ठरतो.५. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया सारखे आजार होण्याची शक्यता असते अशावेळी शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ खाणे अतिशय फायदेशीर ठरते.

६. खोबरं खाल्ल्याने त्यातील चांगले फॅट्स त्वचेला पोषण देते, ते हायड्रेटेड ठेवण्यास देखील मदत करते. खोबरं खाल्ल्याने त्वचेच्या कोरडेपणापासून बचाव करता येतो.७. स्त्रिया एका विशिष्ट वयानंतर अशक्त होतात. लोहाच्या कमतरतेमुळे हा अशक्तपणा येतो आणि यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशावेळी रोजच्या जेवणांमध्ये खोबऱ्याचा वापर नक्की करावा.

८. उपाशी पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. नारळात जास्त फायबर आणि कमी चरबी असते. रिकाम्या पोटी नारळ खाल्ल्याने भूक लवकर लागत नाही, व वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय नारळात ट्रायग्लिसराइड्स देखील असते, जे शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतात.९. नारळात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. सकाळी रिकाम्या पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने शरीराला नारळातील अँटीऑक्सिडंट्स मिळतात. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

१०. जर आपलं पोट खराब झालं असेल तर ओल्या खोबऱ्याचा एक मोठा तुकडा रात्री झोपण्यापूर्वी खा. यामुळे सकाळी आपले पोट साफ होण्यास मदत मिळते. खोबऱ्यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होते.


गोड पदार्थांतील गूळ, खोबरं खाण्याने आरोग्याला होणारे फायदे...