बातम्या

चालण्याचे आरोग्य दायी फायदे

Health benefits of walking


By nisha patil - 7/23/2023 7:37:39 AM
Share This News:



चालण्याचे आरोग्य दायी फायदे –
खेळाडू आणि सामान्य लोक जी शारीरिक तंदुरुस्ती बाबत चौकस असतात ते नेहमीच नवनवीन आणि अत्याधुनिक व्यायाम उपकरण आणि नवीन प्रकारच्या व्यायामबाबत माहिती शोधत असतात जेणेकरुन त्यांच जे क्षेत्र आहे त्यात त्यांच्या कामगिरी त अधिक सुधारणा व्हावी तसेच आरोग्य मजबुत व्हावं.

परंतु सर्वोच्च म्हत्वाचा पण अगदी साधा ,सहज ,सोपा व्यायामाचा प्रकार आपण विसरत आहोत.

निसर्गाने मानवाचं शरीर अस बनवलं आहे की आपण सरळ उभं राहू शकतो आणि दोन पायांवर चालू शकतो.तंत्रज्ञान च्या ओघात मात्र वाहनांनी सर्व जीवन व्यापल आहे ,इतकं व्यापल की साधं रस्त्यावर, नाक्यावरच्या दुकानावर जाऊन दूध आणायचा म्हटलं तरी बरीच लोक बाईक वर जाऊन आणतील पण चालणं  टाळतील.

नवीन संगणकीय कामं वाढत चालल्याने दिवसोगणिक शारीरिक कष्टाचे काम कमी होत चाललीत.घरातील लहान मोठी शारीरिक दैनंदिन काम ही आज उपकरण द्वारे होताना दिसत आहेत.काही शारीरिक कष्ट न करता रोजची घरगुती काम करून घेण्यात लोकांचा कल वाढत आहे.ठरवलंA तर सहज प्रत्येक जण 30 मिनिटं पेक्ष्या सहज चालू शकतो, पण याबाबत लोकांमध्ये उदासीनता पाहवयास मिळते.


दिवसभर सतत हालचाल करणे,शकय तितकं चालण्या ऐवजी लोक बैठे काम करताना दिसतात. वर म्हटल्याप्रमाणे मानवी शरीराची रचना ही सतत बैठे काम करण्यास योग्य नाही. जितकं आपण शारीरिकरचणे च्या विरुध्द जाऊन काम करू तितकं शरीराला हे घातक ठरू शकते.
मानवाच्या दैनंदिन हालचालीं करता व वाहतुकी करता ,निसर्गाने चालणं या प्रकाराची बेसिक नि मुख्य प्रकार म्हणून रचना केली आहे.

म्हणनुच शरीराच्या उत्तम आरोग्याकरता चालणं या साध्या व्यायाम वर भर दिला पाहिजे. रोज चालणं हा आपल्या दैनंदीन कृतीचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे.लक्षात असू द्या आपलं शरीर जितकं अधिक क्रियाशील राहील ,आपण सतत काही न काही काम करत राहाल तितकं आपलं शरीर कार्यक्षम राहील.


चालण्याचे आरोग्य दायी फायदे