विशेष बातम्या
ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये आरोग्य विभागीय आढावा बैठक
By nisha patil - 3/24/2025 4:58:31 PM
Share This News:
ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये आरोग्य विभागीय आढावा बैठक
PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना
हिवताप, डेंग्यू, क्षयरोग, कुपोषणासंदर्भात ठोस उपाययोजनांवर चर्चा
ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक पार पडली. यामध्ये रोजंदारी कामगारांचे वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील हिवताप, डेंग्यू, सिकलसेल, क्षयरोग आदींच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील मुलींच्या जन्मदरातील तफावत दूर करण्यासाठी PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आबिटकर यांनी दिल्या. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अधिकाधिक खासगी रुग्णालयांचा समावेश करून जनतेला आरोग्य सुविधा देण्यावर भर देण्यात आला.
यावेळी राज्यमंत्री ॲड.आषिशजी जैस्वाल, आरोग्य उपसंचालक डॉ.शिशीकांत शंभरकर, ऊपसंचालक आरोग्य सेवा नागपूर डॉ.अजय डवले, संचालक सार्वजनिक आरोग्य संस्था महाराष्ट्र राज्य डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निवृत्ती राठोड यांच्यासह जिल्हा शल्य चिकीत्सक तसेच चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, भंडारा जिल्हायातील अधिकारी उपस्थित होते.
ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये आरोग्य विभागीय आढावा बैठक
|