निरोगी आरोग्य ही सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली- आमदार ऋतुराज पाटील

Healthy health means healthy life Gurukilli MLA Rituraj Patil


By nisha patil - 5/29/2023 8:00:01 PM
Share This News:



कोल्हापूर/ आपले आरोग्य चांगले असेल तर आपण सक्षमपणे आयुष्य जगू शकतो. निरोगी आरोग्य ही सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली त्यामुळे एखाद्या आजाराकडे दुर्लक्ष करण्याऐवजी नागरिकांनी वेळेत उपचार घ्यावेत असे आवाहन आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले.  आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिभा नगर येथे मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ४०० हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

   आमदार ऋतुराज पाटील म्हणाले कोरोनाच्या कठीण काळात प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे.  त्यामुळे आपले आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येक गरिब आणि गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही अनेक योजना राबवत आहोत. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन त्यांचे आयुष्य निरोगी राहण्यास मदत होईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला. 

    सुमारे 400 हून अधिक नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. आरोग्याशी निगडित अनेक चाचण्या या शिबिरात करण्यात आल्या. पुढील उपचारासाठी त्यांना डी. वाय. पाटील हॉस्पिटल या ठिकाणी मोफत सुविधा देण्यात येणार आहेत. 

 सामाजिक कार्यकर्ते सुरेश ढोणुक्षे आणि अनिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महेश कोरवी, उमेश पवार, अनिल कलकुटकी, जितेंद्र ढोबळे, सर्जेराव साळोखे, समीर कुलकर्णी, श्रीधर गोजारे, स्वप्नील रजपूत, संदीप पाटील, काकासाहेब पाटील यांच्यासह दौलत नगर, शाहू नगर, सम्राट नगर, राजारामपुरी परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, डी. वाय. पाटील हॉस्पीटलचे डॉ. प्रताप वरुटे,  डॉ. सोनल गोवारीकर, डॉ.  वृष्टी जैन यांच्यासह  वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.


निरोगी आरोग्य ही सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली- आमदार ऋतुराज पाटील