बातम्या
विधानसभा अध्यक्षांसमोर आज आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी
By nisha patil - 10/20/2023 4:23:25 PM
Share This News:
आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही यावर दोन्ही बाजूने मागील सुनावणीत युक्तिवाद केला होता. आज याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी की नाही ? यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या वकिलांकडून याचिकांवर एकत्रित सुनावणीला विरोध केला जातोय. प्रत्येक आमदारांची बाजू ऐकून घ्यावी असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. तर याचिकांवर एकत्रित सुनावणी घेऊन लवकरात लवकर निकाल द्यावा असे ठाकरे गटांच्या वकिलांनी मागणी आहे.
तर आज याच याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार की नाही ? याचा काय निर्णय लागतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर आज आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी
|