बातम्या
'हे' पिवळे पदार्थ खाऊन टाळता येईल हृदयविकाराचा झटका!.
By nisha patil - 7/8/2023 8:43:42 AM
Share This News:
हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, याची काळजी घेतली नाही तर हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल डिसीज सारखे धोकादायक आजार होण्याचा धोका असतो.
अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन आहारातून तेलकट पदार्थ वगळून केवळ आरोग्यदायी पदार्थच खाणे गरजेचे आहे. आहारतज्ञांच्या मते काही पिवळी फळे आणि भाज्या खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.
‘हे’ पिवळे पदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका टाळता येईल
आंबा : आंब्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. या फळासाठी तर आपण उन्हाळ्याच्या हंगामाची वाट पाहतो जेणेकरून आपण या गोड आणि स्वादिष्ट फळाचा आस्वाद घेऊ शकू, हृदयाच्या आरोग्यासाठी आंबा चांगला आहे.
लिंबू : लिंबू हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले फळ आहे, ज्याचा उपयोग कोशिंबीर पासून ते लिंबूपाण्यात केला जातो, यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास तसेच वजन कमी होण्यास मदत होते.
केळी : या फळाचे फायदे आपल्याला माहित आहेतच. मर्यादित प्रमाणात केळी खाल्ल्याने वजन कमी होते आणि हृदयाच्या आरोग्यास फायदा होतो.
अननस : अननस खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. मर्यादेपेक्षा जास्त हे फळ खाऊ नका कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
पिवळी शिमला मिरची : पिवळी शिमला मिरची फायबर, लोह आणि फोलेटने समृद्ध आहे. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि त्याचबरोबर शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि हृदयही निरोगी राहते.
'हे' पिवळे पदार्थ खाऊन टाळता येईल हृदयविकाराचा झटका!.
|