बातम्या

काळा दिन " च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त

Heavy police deployment on Maharashtra


By nisha patil - 10/31/2023 9:01:46 PM
Share This News:



1 नोव्हेंबर काळ्या दिनी मराठी जनतेच्या निषेध फेरीत आणि जाहीर सभेत सहभागी होऊ नये, यासाठी कर्नाटक  जिल्हा प्रशासनाने सोमवारी महाराष्ट्राचे मंत्री शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्यावर बेळगाव जिल्हा बंदी घोषित केली आहे. जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी सोमवारी रात्री हा आदेश बजावला आहे.


महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये   खासदार धैर्यशील माने हे तज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत तर मंत्री शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर हे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री आहेत. 
 महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 1 नोव्हेंबर रोजीच्या काळ्या दिनाला हे मंत्री उपस्थित राहून सीमाभागातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतील, त्यामुळे मराठी आणि कन्नड भाषिकांत संघर्ष निर्माण होईल, यामुळे त्यांना बेळगाव जिल्हा बंदी करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.  याशिवाय 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यन्त ही बंदी असणार आहे, असे नमूद  करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या फेरीला आणि जाहीर सभेला या मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवू नये, असे सूचित करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कोगनोळी टोलनाका येथे लावला पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.  एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नेते बेळगावात येऊ नयेत यासाठी  महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर  कर्नाटक सरकारने पोलीस बंदोबस्त ठेवून खबरदारी घेतली आहे


काळा दिन " च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त