बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 57 बंधारे पाण्याखाली

Heavy rain in Kolhapur district 57 dams under water


By nisha patil - 8/7/2024 2:30:47 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. जिल्ह्याच्या  पश्चिम डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे सर्वच नद्या,नाले ओसंडून वाहू लागलेत.दरम्यान जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील घाटकरवाडी,गवसे.
 

राधानगरी तालुक्यातील झापाचिवाडी खामकरवाडी हे धरण प्रकल्प भरलेत. तर भुदरगड तालुक्यातील वासनोली  शाहूवाडी तालुक्यातील भंडारवाडी, बुरमबाळ.इजोली,बर्की ,वाकोली, येळवण

जुगाई,आयरेवाडी,गावडी हे लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेत.अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिलीय.राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सध्या 45 टक्के धरण भरलय तर भोगावती नदीमध्ये 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 57 बंधारे पाण्याखाली