बातम्या
पुण्यात आगामी सहा दिवस मुसळधार पाऊस
By nisha patil - 6/27/2023 4:53:51 PM
Share This News:
तारा न्युज वेब टीम : शहरात मंगळवारपासून (दि. 27) मध्यम ते मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात 2 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, दोन दिवसांत शहरात 25 मिमी पावसाची नोंद झाली असून, जूनमध्ये एकूण 45 मिमी पाऊस झाला. शहरात 23 जूनपर्यंत 20.4 मिमी पावसाची नोंद झाली. 24 पासून मान्सून बरसण्यास सुरुवात झाली. रविवारी (दि. 25) लागोपाठ दुसर्या दिवशी पाऊस झाल्याने पावसाचा टक्का वाढून तो 45 मिमीवर गेला. दरम्यान, 27 जून ते 2 जुलैदरम्यान शहरासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाचा जोर घाटमाथ्यावर जास्त राहणार असल्याने त्याचा परिणाम शहरात होणार आहे.
खडकवासला पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी
खडकवासला साखळी प्रकल्पातील खडकवासालासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. रविवारी पावसाचा जोर मध्यम होता. मात्र, सोमवारी पावसाचा जोर अत्यंत कमी झाला होता. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला 1, पानशेत 7, वरसगाव-10, तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 10 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
पुण्यात आगामी सहा दिवस मुसळधार पाऊस
|