विशेष बातम्या
कोकण ,गोव्याला पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा
By nisha patil - 6/29/2023 4:51:27 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : महाराष्ट्र-केरळ किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढगांचे डोंगर (ऑफ शोअर ट्रफ) तयार झाल्याने आगामी पाच दिवस कोकण व गोवा भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाटाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.उर्वरित राज्यात आगामी 48 तास संततधार राहील. दरम्यान, बुधवारी मान्सूनने राजस्थानसह 99 टक्के देश व्यापला.कोकण, गोव्यात मोठ्या पावसाची शक्यता
हवामान विभागाने राज्यातील घाट भागांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यात कोल्हापूर, सातारा, पुणे व नाशिक येथील घाटांचा समावेश आहे. या भागात पर्यंटकांनी फिरायला शक्यतो जाऊ नये. गेलात तर अतिशय काळचीपूर्वक वाहने चालवा, पावसात काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण ,गोव्याला पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा
|