बातम्या
राज्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा
By nisha patil - 1/7/2023 4:44:33 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : भारतीय हवामान विभागाने (IMD) गोव्यासाठी आगामी पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यातही गोव्याच्या विविध भागांमध्ये 4 जुलै पर्यंत अतिवृष्टी होईल, असे विभागाने म्हटले आहे.आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.गेल्या आठवड्याभरापासून गोव्यात पावसाने जोर धरला आहे. या किनारी राज्यात जुनचा सुरवातीचा कालावधी कोरडा गेला होता. जुनच्या पहिल्या एक ते चोविस जून या काळात पावसाची सरासरी अत्यंत कमी राहिली होती.
दरम्यान, आयएमडीने शुक्रवारच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, किनारी भागात वारे वेगाने वाहतील. या संपुर्ण काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या या हंगामात एक जूनपासून ते आत्तापर्यंत मडगावमध्ये सर्वाधिक 792.2 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती आहे.
राज्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा
|