बातम्या

परभणीतील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शासनाने तातडीने मदत दिली नाही; मोर्चाचा इशारा

Heavy rains in Parbhani caused huge loss to farmers


By nisha patil - 9/9/2024 10:50:45 PM
Share This News:



परभणी ( प्रतिनिधी) गेल्या आठवड्यात झालेल्या परभणी जिल्ह्यातील  अतिवृष्टीने  सोयाबीन , कापूस , उडीद , तूर व मक्का पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आठ दिवस झाले तरीही शासनाने अजूनही सानुग्रह अनुदान दिले नाही , पडझडीचे पंचनामे सुरू केलेले नाही. येत्या आठ दिवसात सदरचे अनुदान खात्यावर जमा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर पुरग्रस्तांना घेऊन मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक  राजू शेट्टी यांनी दिली. 
     

 आज मा. खा. छत्रपती संभाजीराजे , मा. खा. राजू शेट्टी ,आमदार बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी मानवत तालुक्यातील वाझूर , सावली या  नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.अतिवृष्टीने शेतकरी हतबल झालेला असून शासनाने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले कि ,पुरग्रस्त भागातील अनेक कुटूंबे उघड्यावर पडलेली आहेत. जमीनी खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून पुरग्रस्तांना वा-यावर सोडण्यात आले असून जवळपास आठ ते दहा दिवस झाले तरीही लोकांना सानुग्रह अनुदान देण्यात आले नाही. 
 

  आमदार बच्चू कडू बोलताना म्हणाले कि सरकारने यामध्ये गांभीर्यांने लक्ष घालून पिकविमा कंपन्यांना तातडीने संरक्षित रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत आदेश देणे गरजेचे असून ज्या शेतक-यांनी पिकविमा उतरविला नाही त्यांना २०१९ च्या धर्तीवर मदत करण्याची मागणी करण्यात आली. आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी यांना धारेवर धरत तातडीने पंचनामे न केल्यास 
जशास तसे उत्तर देवू असा सज्जड दम भरला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना , स्वराज संघटना व प्रहार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.


परभणीतील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शासनाने तातडीने मदत दिली नाही; मोर्चाचा इशारा