बातम्या
पुण्याला पुढील तीन दिवस पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
By nisha patil - 6/20/2024 8:18:16 PM
Share This News:
पुण्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुण्यात 20 जून ते 23 जूनपर्यंत पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. दरम्यान शेतकऱ्यांनी पुरेशा पावसाची वाट पाहून पेरणी करावी, असं आवाहन हवामान विभागाने केलंय. तसेच पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांना इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात जूनमध्ये साधारण पावसाने सरासरी ओलांडली आहे. 76 टक्के अधिकचा पाऊस पडला आहे मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाने मोठा ब्रेक घेतला असला तरीही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट नसल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात प्रामुख्याने पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार आहे.
पुण्याला पुढील तीन दिवस पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
|