बातम्या
राज्यात पुढील 48 तास मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता
By nisha patil - 11/29/2023 7:38:43 PM
Share This News:
राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. . हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यासह देशातही पावसाचा अंदाज आहे. राज्यात विविध ठिकाणी आज मध्यम पावसाच्या सरी कोसळणार आहेत, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. .
पुढील दोन-तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पुढील 48 तास विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे . काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.
अरबी समुद्रालगत चक्रावार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे बीड, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, नागपूर, जालना, नांदेड, गोंदियामध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे
राज्यात पुढील 48 तास मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता
|