बातम्या
आचारसंहितेमुळे कोल्हापुरातील हेलिकॉप्टर हवाई सफर लांबणीवर
By nisha patil - 3/28/2024 8:04:49 PM
Share This News:
२९ मार्च रोजी सुरू होणारा हेलिकॉप्टर हवाई सफर रद्द करण्यात आले असल्याची माहिती पन्हाळा टुरिझम मॅनेजमेंटच्या वतीने देण्यात आली आहे.
हेलिकॉप्टरमधून हवाई सफर करण्याची सुवर्ण संधी पन्हाळा टुरिझम मॅनेजमेंटच्या वतीने कोल्हापुरातील पर्यटक लोकांसाठी सुरु करण्यात आला होता. २९ मार्च ते ३१ मार्च सलग तीन दिवस हेलिकॉप्टर मधून हवाई सफरचे आयोजन करण्यात आले होते. खास पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोल्हापुरात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या हवाई सफर मधून कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर,गड किल्ले आकाशातून पाहन्याची सुवर्ण संधी मिळणार होती पण आता त्याला ब्रेक लागल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आचार संहितेमुळे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने हेलिकॉप्टर राईड पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी यांची दक्षता घ्यावी लवकरच पुढील तारीख जाहीर करण्यात येईल अशी माहिती पन्हाळा टुरिझम मॅनेजमेंटच्या वतीने देण्यात आली आहे
आचारसंहितेमुळे कोल्हापुरातील हेलिकॉप्टर हवाई सफर लांबणीवर
|