बातम्या

गडहिंग्लज’मध्ये आजपासून हेल्मेटसक्ती !

Helmets mandatory in Gadhinglaj from today


By nisha patil - 10/5/2024 5:02:40 PM
Share This News:



गडहिंग्लज तालुक्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक असून शहराच्या हद्दीत हेल्मेटची सक्ती शिथिल करण्यात आली आहे. परंतु, शहरातून बाहेर जाणाऱ्या व बाहेरून शहरात येणाऱ्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गडहिंग्लज पोलिसांकडून आजपासून (शुक्रवार) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग आणि तालुक्यातील बहुतेक रस्ते चांगले असल्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातातील मृतांची संख्याही वाढली आहे. रस्ते अपघातात गेल्या तीन महिन्यात तालुक्यात १२ जणांचा बळी गेला आहे. म्हणूनच हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


गडहिंग्लज’मध्ये आजपासून हेल्मेटसक्ती !