बातम्या
कणेरी पैकी भोसलेवाडीतील देवमाणसाकडून मंदीरासाठी लाखांची मदत - चेअरमन सोनल दळवी
By nisha patil - 3/19/2024 7:39:59 PM
Share This News:
पन्हाळा - प्रतिनिधी कणेरी पैकी भोसलेवाडी येथील नामदेव बाबू भोसले या व्यापाऱ्याने कणेरी येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अकरा लाखाचा निधी दिला आहे. नामदेव भोसले हे गेली काही वर्ष जनावराचा व्यापार करत आहेत. पायात चप्पल न घालणारे नामदेव भोसले हे पंढरपूर येथील विठ्ठल भक्त असून एकादशी ला पंढरपूरला जातात.
तसेच अनेक वर्षापासून ते गावात स्वखर्चाने पारायण सोहळा आयोजित करतात.तसेच पारायण सोहळ्यात लोकांना ये जा करण्यासाठी मोफत गाडीची सोय करण्यात येत असते. लहानापासुन ते अबालवूध्द यांना आपुलकीने बोलवितात.या त्यांच्या गोड स्वभावाने ते सार्या परिसराला "महाराज" म्हणून ते प्रसिद्ध आहेत.त्यांनी पन्हाळा ,शाहूवाडी, करवीर, गगनबावडा,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगोला, हातकणंगले आदी तालुक्यात बैलांची विक्री करून चांगला व्यवसाय केला आहे. यामुळे त्यांचे नाव परिसरात एक चांगला व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहे.
त्यांनी आज सिद्धेश्वर पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सोनल दळवी यांच्या शब्दाला मान देत आज गावच्या मंदिरासाठी अकरा लाखाचा निधी दिला आहे. या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कोतोली परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे. या कामे त्यांना सिद्धेश्वर पतसंस्थेचे संचालक, सिद्धेश्वर सेवा संस्थेचे संचालक तसेच कणेरीतील माजी सरपंच गणपती पाटील, उत्तम पाटील, प्रदीप भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
कणेरी पैकी भोसलेवाडीतील देवमाणसाकडून मंदीरासाठी लाखांची मदत - चेअरमन सोनल दळवी
|