बातम्या

चिमूरडी वरील अत्याचार लपवल्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय...

High Courts decision due to the concealment of atrocities on children


By nisha patil - 8/23/2024 3:05:39 PM
Share This News:



ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
 

जर शाळा सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अधिकार आणि इतर गोष्टींवर बोलण्यात काय अर्थ आहे असे न्यायालयाने म्हटले आहे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची माहिती लपवल्याबद्दल शाळा प्रशासनाविरुद्ध pocso अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात सांगितला आहे.
     

 यानंतर आता या प्रकरणाची तपास करत असलेल्या एसआयटीने शाळेविरोधात pocso अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.राज्यात बहुदा पहिल्यांदाच शाळेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा पक्ष कायद्याचा कलम २1 अंतर्गत दाखल झाला आहे.बदलापूर प्रकरणात विशेष तपास पथकाने शाळेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफ आय आर नोंदवला आहे.
   

 न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने केस डायरी आणि एफआयआरची प्रतही सरकारकडून मागवली आहे. ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी (27 ऑगस्ट) होणार आहे. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी 23 वर्षीय सफाई कर्मचारी अक्षय शिंदेनं बदलापूर येथील आदर्श शाळेत बालवाडीत शिकणाऱ्या 3 आणि 4 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. बुधवारी (21 ऑगस्ट) न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली.


चिमूरडी वरील अत्याचार लपवल्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय...