बातम्या

विवेकानंद महाविद्यालयात उच्च शिक्षणाच्या संधी

Higher Education Opportunities at Vivekananda College


By nisha patil - 12/15/2023 5:56:06 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजच्या ज्युनिअर विज्ञान विभागाच्या वतीने आयोजित  शैक्षणिक फेअर 2023-24 चे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते झाले. 

आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. आर. आर.  कुंभार म्हणाले, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील प्लेसमेंटच्या संधी ओळखून त्यानुसार अभ्यासक्रम निवडावेत.  विवेकानंद कॉलेज हे स्वतंत्र विद्यापीठ होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत असून या ठिकाणी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यासाठी अनेकविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.  मेडिकल, इंजिनिअरींग सोबतच विद्यार्थ्यानी इतरही क्षेत्रात आपल्या आवडीनुसार करिअर घडवावे.  विवेकानंद कॉलेजने सातत्याने विविध उद्योग संस्थांशी करार केले आहेत.  कॅम्पस प्लेसमेंट व्दारे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांकरीता उद्योग शिक्षण, उद्योजक, मानसिकतेचा विकास, कला, क्रीडा, व्यावसायिक शिक्षण  असे अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.  

कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने व रोपास पाणी घालून झाली.   शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सभागृहात विविध उपक्रमानी शैक्षणिक फेअर कार्यक्रम उत्साहात पार पडला.   याप्रसंगी विज्ञानावर आधारित पोस्टर स्पर्धा, नृत्य्, गायन, फनी गेम्स्, फुड स्टॉल इ. उपक्रम घेण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक प्रा गीतांजली साळुंखे यांनी केले. याप्रसंगी प्रा डी आर पंडीत, प्रा एस एस जगताप, डॉ सौ एम बी साळुंखे, प्रा आर एन पाटील, प्रा एच जी पाटील यांच्यासह कनिष्ठ विज्ञान शाखेकडील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.  आभार कनिष्ठ् विज्ञान विभागप्रमुख प्रा एम ए कुरणे यांनी मानले.


विवेकानंद महाविद्यालयात उच्च शिक्षणाच्या संधी