बातम्या
हिंदुजा रुग्णालयानं केली मृतदेहाची अदलाबदल; वरणगे पाडळीत संताप
By nisha patil - 2/29/2024 7:50:08 PM
Share This News:
हिंदुजा रुग्णालयानं केली मृतदेहाची अदलाबदल; वरणगे पाडळीत संताप
प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे कोल्हापूर - करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील कृष्णात महादेव पाटील यांच्यावर मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला. मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयातील प्रशासनानं त्यांचा मृतदेह देण्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह बांधून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईक मृतदेह घेवून वरणगे पाडळी इथं आले. आज दुपारी पै-पाहुणे, सगेसोयरे सगळे स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी जमा झाले. मात्र, अंत्यविधी करताना तो मृतदेह कृष्णात पाटील यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं लक्षात आलं. यानंतर सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे झालेल्या या प्रकाराबद्दल नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हिंदुजा रुग्णालयानं केली मृतदेहाची अदलाबदल; वरणगे पाडळीत संताप
|