बातम्या

अनधिकृत बांधकाम प्रश्नी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Hindutva organizations aggressive in Kolhapur over unauthorized construction


By nisha patil - 12/27/2023 7:43:32 PM
Share This News:



अनधिकृत बांधकाम प्रश्नी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

आज सकाळी महापालिकेच्यावतीने लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृत मदरसा आणि मस्जिद मोठ्या पोलीस बंदोबस्तात बंद केल्या. मात्र ही बांधकाम अनधिकृत असताना एवढा मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन न पाडता फक्त बंद का केली असा सवाल करत ही बांधकामा तातडीने पाडावे अशी मागणी हिंदुत्वादी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत महापालिका आयुक्त आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी येत्या सात दिवसांचा अल्टीमेटम हिंदूत्वादी संघटनांनी प्रशासनाला दिला आहे.

यावेळी गोंधळाचं वातावरण झाल्यानंतर आयुक्त या बैठकीतून निघून गेल्या मात्र हिंदुत्ववादी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आयुक्त पुन्हा या शिष्टमंडळासमोर आल्या. मात्र उशिरापर्यंत याबाबत तोडगा निघाला नाही त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी पापाची तिकटी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम अपूर्ण असताना देखील जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार आणि माजी नगरसेवक तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनावरण केलं. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत आपल्या भावना व्यक्त केल्या.


अनधिकृत बांधकाम प्रश्नी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक