बातम्या
स्वर्णीम युवा मंडळ अकिवाट यांचे वतीने ऐतिहासीक नाणी प्रदर्शन
By nisha patil - 9/23/2023 11:34:05 PM
Share This News:
सुळकुड गावाचे सुपुत्र शेखर कोणे यांना लहानपणापासूनच दुर्मिळ नाणी संग्रह करणेचा छंद आहे
यामध्ये त्याचे कडे शिवकालीन ईतिहास सांगणारी,त्याकाळात चलनात असणारी नाणी तसेच कोल्हापूरचा ईतिहास सांगणारी ,परदेशातील नाणी , भारतातातील वेगवेगळ्या राज्यात प्रचलित असलेल्या मुद्रा असे अनेक दुर्मिळ नाण्याचा ,नोटांचा संग्रह त्यांनी जोपासला आहे
आजच्या युवा पिढीला ऐतिहासीक नाणी यांचा अभ्यास होणेसाठी तसेच त्याना ज्ञान प्राप्त होणेसाठी स्वर्णीम युवा मंडळ अकिवाट यांनी गणेश उत्सवाचे औचित्य साधून अकिवाट येथे हे प्रदर्शन भरवले होते . या प्रदर्शनास शेखर कोणे यांनी नाण्याबाबत माहिती सांगून प्रबोधन केले
या प्रदर्शनाला अकिवाट येथील युवक युवती,ग्रामस्थ यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनामुळे युवा पिढीचे चांगले प्रबोधन झालेमुळे स्वर्णीम मंडळाचे कार्यकर्त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
शेखर कोणे याना स्वर्णीम युवा मंडळाचे वतीने सन्मानचिह्न देऊन त्यांचा गौरव करणेत आला यावेळी मंडळाचे कार्यकर्ते,पदाधिकारी,युवक युवती,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
स्वर्णीम युवा मंडळ अकिवाट यांचे वतीने ऐतिहासीक नाणी प्रदर्शन
|