बातम्या

हॉलिवूड अभिनेता एंगस क्लाउडचं वयाच्या 25 व्या वर्षी निधन; वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने सोडले प्राण

Hollywood actor Angus Cloud dies aged 25


By nisha patil - 1/8/2023 7:43:50 PM
Share This News:



हॉलिवूड अभिनेता एंगस क्लाउडचं वयाच्या 25 व्या वर्षी निधन; वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने सोडले प्राण 

 हॉलिवूड अभिनेता आणि 'यूफोरिया' फेम एंगस क्लाउडचं निधन झालं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने अभिनेत्याने प्राण सोडले आहेत. 

एंगस क्लाउडची 'यूफोरिया' ही सीरिज चांगलीच गाजली. आता अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी एंगस राहत असून राहत्या घरीच अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे त्याचे कुटुंबीय, चाहते आणि हॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. 

एंगस क्लाउडच्या कुटुंबियांना चाहत्यांना माहिती देत सांगितलं आहे की,"एंगस त्याच्या लाडक्या वडिलांना पुन्हा एकदा भेटला आहे. त्याचं त्याच्या वडिलांसोबत खूप घट्ट नातं होतं. एंगसला त्याच्या वडिलांच्या निधनाचा मोठा मानसिक धक्का बसला होता. पण आम्ही सर्व जण त्याच्यासोबत होतो. त्यामुळे त्याने स्वत:ला सावरायला हवं होतं". एंगसची 'यूरोफिया' ही वेबसीरिज चांगलीच गाजली. या सीरिजमधील त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. या सीरिजमुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. एंगस न्यूयॉर्कमझील Brooklyn या रस्त्यावर त्याच्या मित्रांसोबत फिरत होता. त्यामुळे 'यूरोफिया'च्या कास्टिंग दिग्दर्शकाची नजर एंगसवर पडली आणि त्यांनी त्याला विचारणा केली.


हॉलिवूड अभिनेता एंगस क्लाउडचं वयाच्या 25 व्या वर्षी निधन; वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने सोडले प्राण