बातम्या

हॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल क्रिस्टी ली ब्रिंक्ले हिला नुकतच स्किन कॅन्सर झाल्याचं निदान

Hollywood actress and model Christie Lee Brinkley was recently diagnosed with skin cancer


By nisha patil - 3/15/2024 6:41:13 PM
Share This News:



हॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल क्रिस्टी ली ब्रिंक्ले हिला नुकतच स्किन कॅन्सर  झाल्याचं निदान झाल्यानंतर
 तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. पण चांगली बाब म्हणजे क्रिस्टीला तिला कॅन्सर झाल्याचं लवकरच कळलं त्यामुळे तिच्यावर लवकर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वीही झाली. 

नुकताच क्रिस्टीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केलाय. यामध्ये तिने तिच्या  चेहऱ्याचा तो भाग दाखवला आहे, जिथे शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान तिला कॅन्सरबद्दल कसं कळलं याबद्दलही तिने तिच्या या पोस्टमध्ये सांगितलं आहे.  

क्रिस्टी ली ब्रिंक्लेने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला त्यामध्ये तिने याबद्दल खुलासा केला. आपल्या मुलीला ती डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. तेव्ही तिच्या चेहऱ्यावरही छोटे छोटे डाग तिला दिसले. त्यामुळे तिने  स्वतःलाही डॉक्टरांकडे दाखवलं. क्रिस्टी लीने सांगितले की, जेव्हा ती तिच्या चेहऱ्यावर फाउंडेशन लावत होती तेव्हा तिला तिच्या चेहऱ्यावर ते डाग दिसले. डॉक्टरांनी लगेचच संपूर्ण परिस्थिती समजून घेत अभिनेत्रीची बायोप्सी केली.

यामध्ये क्रिस्टी ली ब्रिंक्लेच्या चेहऱ्यावरील कॅन्सरग्रस्त भागाची शस्रक्रिया करुन तिचा कर्करोग काढून टाकरण्यात आलाय. डॉक्टरांनी क्रिस्टी लीला सांगितले की तिला बेसल सेल कार्सिनोमा आहे. दरम्यान तिच्या या शस्रक्रियेनंतर क्रिस्टीने डॉक्टरांचे देखील आभार मानले. पोस्टमध्ये तिनं म्हटलं की, कॅन्सरपासून वाचण्यासाठी स्वत:ची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.


हॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल क्रिस्टी ली ब्रिंक्ले हिला नुकतच स्किन कॅन्सर झाल्याचं निदान