बातम्या

गृहमंत्री अमित शहांच्या मोठ्या बहिणीचे निधन ; गृहमंत्र्यांचे दोन दिवस सर्व कार्यक्रम रद्द

Home Minister Amit Shahs elder sister passed away


By nisha patil - 1/16/2024 12:58:30 PM
Share This News:



गृहमंत्री अमित शहांच्या मोठ्या बहिणीचे निधन ; गृहमंत्र्यांचे दोन दिवस सर्व कार्यक्रम रद्द

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ज्येष्ठ भगिनी राजेश्वरीबेन शाह यांचे सोमवारी सकाळी मुंबईत निधन झाले. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्या 65 वर्षांच्या होत्या. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
   

अमित शाहांचे सर्व कार्यक्रम रद्द

ज्येष्ठ भगिनीच्या निधनानंतर अमित शाह  यांनी दोन दिवस सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. भाजपच्या  एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, शाह यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. गुजरातमध्येच त्यांचे दोन कार्यक्रम होते.
   

बनासकांठा जिल्ह्यातील बनास डेअरीमध्ये आणि दुसरा कार्यक्रम गांधीनगरमधील राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीमध्ये होता. शाह हे रविवारीच गुजरातमध्ये आले आहेत. त्यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी आले होते.


गृहमंत्री अमित शहांच्या मोठ्या बहिणीचे निधन ; गृहमंत्र्यांचे दोन दिवस सर्व कार्यक्रम रद्द