बातम्या

कसबा बावड्यात महिला भगिनींचा होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न...

Home Minister Program of Women Sisters completed in Kasba Bawad with enthusiasm


By nisha patil - 9/23/2024 6:57:13 PM
Share This News:



 कसबा बावड्यातील श्री मंगल कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन सत्यजित नाना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या प्रसंगी महिलांनी "होम मिनिस्टर" खेळाचा आनंद लुटला व कदम यांना आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.भाजपचे राज्यसभा खासदार यांनी या वेळी मनोगत व्यक्त करताना महायुती सरकारच्या लाडक्या बहिण योजनेचा महिलांना लाभ झाल्याचे सांगितले आणि महिलांनी महायुती सरकारला पुन्हा संधी देण्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रदीप उलपे, माजी नगरसेविका सीमा कदम, अर्चना पागर, कविता माने, माजी नगरसेवक राजसिंह शेळके आणि भाजपचे सरचिटणीस धीरज पाटील, रविंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


कसबा बावड्यात महिला भगिनींचा होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न...