बातम्या

मा. खा. राजू शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे ८ गावांवरील खरेदी-विक्रीवर निर्बंध प्रशासनाने उठविले

Hon eat Due to the efforts of Raju Shetty the administration lifted the restrictions on buying and selling in 8 villages


By nisha patil - 7/12/2023 7:36:15 PM
Share This News:



 कोल्हापूर-सांगली महामार्गातील चोकाक ते उदगावपर्यंतच्या जमीन हस्तांतरामध्ये १० गावांचा समावेश आहे, असे असताना भूसंपादन विभागाच्यावतीने शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील १८ गावांतील खरेदी-विक्रीवर निर्बंध घातले होते. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक पंधरकर यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अठरापैकी आठ गावांवरील निर्बंध प्रशासनाने उठविले आहेत.
प्रशासनाने हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, तारदाळ, मजले, हातकणंगले, दानोळी, कोथळी, जैनापूर, उमळवाड, उदगाव, तमदलगे, निमशिरगाव, चिपरी, कोंडिग्रे, नांदणी, धरणगुत्ती व जयसिंगपूर या १८ गावांतील खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. 

: बुधवारी झालेल्या नवीन आदेशानुसार कोल्हापूर-सांगली महामार्गातील चोकाक ते उदगावपर्यंतच्या जमीन हस्तांतरामध्ये चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, मजले, हातकणंगले, जैनापूर, उमळवाड, उदगाव, तमदलगे, निमशिरगाव, या गावांचा समावेश करण्यात आलेला असून, तारदाळ, चिपरी, कोंडिग्रे, नांदणी, धरणगुत्ती, जयसिंगपूर, दानोळी व कोथळी ही गावे वगळण्यात आलेली आहेत. यामुळे वरील आठ गावांतील खरेदी-विक्रीकरिता आता राष्ट्रीय महामार्गाच्या परवानगीची गरज लागणार नाही.


मा. खा. राजू शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे ८ गावांवरील खरेदी-विक्रीवर निर्बंध प्रशासनाने उठविले