बातम्या
‘गोकुळ’चे अधिकारी प्रा.श्री.एम.पी.पाटील यांना मानद डॉक्टरेट
By nisha patil - 2/26/2024 10:52:50 PM
Share This News:
‘गोकुळ’चे अधिकारी प्रा.श्री.एम.पी.पाटील यांना मानद डॉक्टरेट
कोल्हापूर:२६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या स्व.आनंदराव ज्ञा. पाटील-चुयेकर प्रशिक्षण केंद्राचे वरिष्ठ अधिकारी श्री.एम.पी.पाटील (सर) यांना तामिळनाडू येथील एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्या वतीने धार्मिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी देऊन रविवार दि.२५/०२/२०२४ इ.रोजी हौसूर (तामिळनाडू) येथे सन्मानित करण्यात आले.
प्रा.डॉ. मारुती पांडुरंग पाटील हे करवीर तालुक्यातील कावणे गावचे रहिवासी असून त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक साहित्यिक व दुग्ध व्यवसाय अशा अनेक माध्यमातून त्यांनी समाजामध्ये चांगल्या विचारांची पेरणी करून माणूस घडविण्यासाठी गेली अनेक वर्षे अविरत धडपड सुरू ठेवली आहे. अत्यंत खडतर परिश्रमातून शिक्षण पूर्ण केले आहे. आई वडील अशिक्षित परंतु त्यांची प्रेरणा मित्रांचे पाठबळ यातून शिक्षणा बरोबर सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अभ्यास करून संपूर्ण जीवन या कार्यासाठी वाहून घेतले आहे.
सध्या ते गोकुळच्या स्व.आनंदराव ज्ञा. पाटील-चुयेकर प्रशिक्षण केंद्रामध्ये उपप्राचार्य म्हणून कार्यरत असून गेल्या तेवीस वर्षा पासून या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे तसेच परराज्यातील जवळजवळ पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले आहे. गोकुळ संघामध्ये म्हैस दूध वाढ गुणवत्ता कार्यक्रमातून १९१ गावांमध्ये ७९६ संस्थांतील ५७०० पंच कमिटी आणि दूध उत्पादकांना दूध वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र इतर राज्यामध्ये ५०००पेक्षा जास्त प्रवचने, व्याख्याने दिले आहेत, विविध प्रकारामध्ये एकूण ३५० कविता लिहिल्या असून अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये काव्यवाचन केले आहे. शिवम प्रतिष्ठान घारेवाडी २००५ ते २०१६ कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पहिले. व्यसन मुक्ती,युवा शक्ती, राष्ट्र भक्तीतून हजारो युवकांना व्यसन मुक्ती केले. ग्रामस्वच्छता अभियान, दारूबंदी, महिला सबलीकरण, लेक वाचवा इत्यादी प्रबोधनात्मक जनजागृती करून समाज घडवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
राज्यस्तरीय विठ्ठल पुरस्कार, राज्यस्तरीय मराठी अध्यापन सेवाकार्य गौरव पुरस्कार, राष्ट्रीय अध्यात्मिक गुरु, गोकुळ दूध संघात संघाचे वतीने गुणवंत अधिकारी गौरव पुरस्कार, समाजरत्न, उत्कृष्ट प्रवचनकार, कला गौरव पुरस्कार असे विविध क्षेत्रामधील पुरस्कार मिळाले आहेत.
यासाठी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संघाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, लाखो दूध उत्पादक, ग्राहक, हितचिंतक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
‘गोकुळ’चे अधिकारी प्रा.श्री.एम.पी.पाटील यांना मानद डॉक्टरेट
|