बातम्या
कामगार दिनी महावितरणात ६८ तांत्रिक कामगारांचा सन्मान
By nisha patil - 2/5/2024 5:24:05 PM
Share This News:
कोल्हापूर परिमंडळ- महावितरणात १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ६८ तांत्रिक कामगारांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महावितरणचा कारभार ऊर्जा मित्रांच्या हातावर तरला आहे. अव्याहतपणे काम करून चांदा ते बांदा प्रकाशमान ठेवण्याचे काम ऊर्जामित्र करतात, असे गौरवोद्गार मा.श्री.भागवत यांनी काढले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता मा.श्री.अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) मा.श्री. सुधाकर जाधव, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) मा.श्री.शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता (प्रशासन)मा.श्री.अभिजीत सिकनीस, कार्यकारी अभियंता (प्रशासन)मा.श्री.प्रशांतकुमार मासाळ, कार्यकारी अभियंता मा.श्री.सुनिल माने, कार्यकारी अभियंता मा.श्री.दत्तात्रय भणगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.श्री. भुपेंद्र वाघमारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.श्री. भुपेंद्र वाघमारे, सुत्रसंचालन वरिष्ठ लिपीक मा.श्री.उत्तम पाटील तर आभारप्रदर्शन कार्यकारी अभियंता (प्रशासन)मा.श्री.अभिजीत सिकनीस यांनी केले. जनमित्रांनी उस्फुर्तपणे मनोगते व्यक्त केली.
पुढे बोलताना मा.श्री.भागवत म्हणाले की, १०० टक्के वीज बिल वसुली ही ग्राहकांना ऊर्जा मित्रांनी दिलेल्या सेवेची पावती आहे. प्रत्येकाने सेवाभाव वृत्तीने ग्राहक समाधानासाठी आपले कार्य अविरतपणे चालू ठेवावे, त्यातून मिळणारा आत्मिक आनंद फार मोठा असतो. सुरक्षितपणे काम करणे ही आपली जबाबदारी आहे. सुरक्षेची काळजी घेऊन सुरक्षा साधनांचा वापर करून आपले दैनंदिन काम करावे. 'सर सलामत तो पगडी पचास' या सुरक्षा मुलमंत्राचा पुनर्रोच्चार मा.श्री.भागवत यांनी केला. अधीक्षक अभियंता मा.श्री.अंकुर कावळे यांनी पुरस्कारप्राप्त तांत्रिक कामगारांचे कौतुक करून दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे सांगितले.
पुरस्कार प्राप्त तांत्रिक कामगार
कोल्हापूर - उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी-
सचिन खाडे (शाखा कार्यालय गगनबावडा), संदिप पाटील (कोथळी), बाळू साठे (कांडगाव), अभिजीत पाटील (पडळ), सचिन चौगुले (काखे), विनायक पाटील (वाडी रत्नागिरी), सुरेश जाधव (वारूळ), शशिकांत गायकवाड (शिये), राजाराम मंडोलकर (गडमुडशिंगी), विनायक पाटील (म्हाकवे), रामदास देवडकर (मुरगुड ग्रामीण), उमेश कांबळे (शिरगाव), सागर पाटील (कुर), अशोक कोळी (शिरोली पु.), दत्ता भडंगे (स्टेशनरोड), प्रविण घराळ (टाकाळा), अमर पोवार (लक्ष्मीपुरी), संजय राठोड (दुधाळी), गुरुदत्त कातवरे (उत्तर -इचलकरंजी), रविंद्र खंडागळे (विकासनगर-इलकरंजी), मारुती वाजंत्री (यड्राव), योगेश चव्हाण (कुरुंदवाड), सविता तांबवेकर (भादोले), साजिद मुजावर (हातकणंगले -2), वृषभ झुटाने (जांभळी), प्रशांत कदम (नांदणी), प्रल्हाद सूतार (गिजवणे), सुनिल पाटील (आजरा 1), विठ्ठल पाटील (हलकर्णी 2), मनोल सोनोने (कोवाड 2), सारंग कांबळे (चाचणी विभाग-कोल्हापूर) कोल्हापूर -उत्कृष्ट यंत्रचालक- अभिजीत खोराटे (उपकेंद्र केर्ले), नारायण कुंभार (राधानगरी), अभिजीत पाटील (शेंडापार्क), सलिम नदाफ (शहापूर), सचिन चौगुले (सावर्डे), यासिन तांबोळी (उत्तुर) सांगली-उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी- प्रदिप चव्हाण (शाखा कार्यालय-कवठेएकंद), मारुती कोळी ( धामणी), निशिकांत कांबळे (म्हैशाळ), विजय चंदनशिवे (सावळज 2), अमर ढोबळे (तासंगाव शहर), दादासाहेब मिरजे (माधवनगर 1), योगेश पाटील (रिसाला रोड), इम्तियाज शिलेदार (शिवाजीनगर), राणी घाटगे (टिंबर एरिया), रामचंद्र गडदे (मिरज 1), श्रीकांत लामदाडे (विश्रामबाग), संतोष माने (वाळवा), सारीका सावसाकडे (बोरगांव 2), अशिष शेटे (कासेगाव), अमर सपाटे (चिखली), सागर नांगरे (कडेगाव 2), सुर्यकांत संकपाळ (पलूस 2), अनंत झाकणे (विटा शहर 1), अभिजीत मिसाळ (दिघंची), धनंजय पाटील (देशिंग), शिवाजी ओमासे (आरग), रविंद्र सिंधे (संख), सुनिल कोळेकर (डफळापूर), किशोर कदम (चाचणी विभाग सांगली) सांगली-उत्कृष्ट यंत्रचालक- सदाशिव कोळी (उपकेंद्र खंडेराजुरी), विठ्ठल कमळकर (सांगलीवाडी), राजेंद्रकुमार खुर्द (वाळवा), विकास कवडे (विटा न्यु), अशोक दरुरे (सनमडी) यांना पुरस्कार वितरित करण्यात आले.
कामगार दिनी महावितरणात ६८ तांत्रिक कामगारांचा सन्मान
|