बातम्या
नामदेव समाजांतर्गत गुणवत्ताधारक विध्यार्थी, व्यक्तींचा सन्मान
By nisha patil - 8/21/2023 4:54:55 AM
Share This News:
इचलकरंजी/प्रतिनिधी - श्री संत नामदेव समाजअंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विद्यार्थी व व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक खोत यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक अशोक खोत यांनी, जीवनामध्ये गुणवत्तेचे महत्त्व काय आहे हे नमूद केले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरणकर यांनी स्वागत करताना समाजांतर्गत राबवली जाणारे विविध उपक्रम यांची सविस्तर माहिती सांगितली युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून संघटनेमार्फत घेण्यात येणार्या तालुकास्तरीय आंतरशालेय स्पर्धा 3 सप्टेंबर पासून सुरू होतील अशी घोषणा केली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत नामदेवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर समाजा अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती आणि आणि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सूत्र संचालन प्राध्यापक अनिल अवसरे यांनी तर आभार सुभाष भस्मे यांनी मानले व्यासपीठावर उमाकांत कोळेकर मधुकर खटावकर यांच्यासह मान्यवर होते.
कार्यक्रमास श्री संत नामदेव समाज सेवा मंडळ नामदेव युवक मंडळ नामदेव महिला मंडळ चे सर्व पदाधिकारी सदस्य आणि समाज बांधव उपस्थित होते
नामदेव समाजांतर्गत गुणवत्ताधारक विध्यार्थी, व्यक्तींचा सन्मान
|