बातम्या

चौगुले महाविद्यालयातील गुणवंत्तांचा सत्कार

Honoring the meritorious students of Chaugule College


By nisha patil - 2/3/2024 7:56:29 PM
Share This News:



चौगुले महाविद्यालयातील गुणवंत्तांचा सत्कार

चौगुले महाविद्यालय एक कुटुंब आहे - सचिव शिवाजीराव पाटील

पन्हाळा - श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी अमृता विजय पाटील हिची जिल्हा परिषद,रायगड या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून व सौ.तृप्ती मारुती पाटील हिची जिल्हा परिषद,कोल्हापूर या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संस्था सचिव शिवाजीराव पाटील व प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या यशाबद्दल महाविद्यालय व महाविद्यालय परिसरामध्ये त्यांचे अभिनंदन होत आहे.

यासाठी त्यांना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले,संस्था सचिव शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी.एन.रावण ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस.कुरलीकर,माजी विद्यार्थी संघ समन्वयक व भूगोल विभाग प्रमुख डॉ.भरत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

-श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये सौ.अमृता पाटील व सौ. तृप्ती पाटील यांची प्राथमिक शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना शिवाजीराव पाटील व डॉ. विजयकुमार पाटील सोबत डॉ.भरत पाटील,प्रा.एम.वाय.पोवार,डॉ.बी.एन. रावण,डॉ.एस.एस.कुरलीकर व मान्यवर उपस्थित होते.


चौगुले महाविद्यालयातील गुणवंत्तांचा सत्कार