बातम्या

रूग्णालयात काम करणारेच निघाले चोरटे...

Hospital workers turned out to be thieves


By nisha patil - 5/4/2024 9:48:21 PM
Share This News:



 कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर -कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात डॉक्टर बाफना यांचं बाफना सुपर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे. २ एप्रिल रोजी हॉस्पिटलच्या ड्रॉवर मधून एक लाख ८५ हजार ९५० रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी हॉस्पिटलचे व्यवस्थापक अमोल मिस्त्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना या हॉस्पिटलमध्ये काम करणारे अमित फराकटे आणि अमोल जाधव यांनी ही चोरी केली असल्याचं निष्पन्न झालंय. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना हे दोघेजण टेंबलाई नाका उड्डाणपूल इथ येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपयांची रोकड २ मोबाईल संच आणि दुचाकी असा २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.


रूग्णालयात काम करणारेच निघाले चोरटे...