बातम्या
हॅाटेल सिध्दराज बिअर बार ला कुलूप लागलेच पाहिजे
By nisha patil - 5/12/2023 11:03:19 PM
Share This News:
कोल्हापुरातील कळे.,येथील गट नं.१०७१ मधील ग्रामपंचायत मिळकत नं.१३६४ मधील हॅाटेल सिध्दराज बिअर बार व परमिटरूमचा परवाना शासनाकडून शांताबाई चौगुले व त्यांचा मुलगा संदिप चौगुले याना त्यांचे उदरनिर्वाहाकरीता प्राप्त झालेलेअसून तो त्याच कारणासाठी वापरायचा आहे, ते लायसंन्स कोनाला ही भाडे तत्वावरती द्यायचे नाही अशी शासनाची अट आहे ,
शासनाच्या परवानगीशिवाय भाड्याने देणेच्या नावाखाली मासवर्गीय समाजातील बेरोजगार ,व्यावसाय इच्छुक लोकांना लाखोंचा गंडा घालत आहेत बिअर बार व परमिट रुम भाड्याने देऊन मागासवर्गीय समाजातील लोकांना हेरून त्यांच्याकडून डिपॅाझीट च्या बहाण्याने लाखो रुपये उकळून ११ महिण्याचा करार करायचा आणी मुदतिपूर्वी या ना त्या कारणावरून भाडेकरूंशी भांडण करायचे व त्यांना पिटाळून लावायचे ,तसेच मालमत्तेत अनेक प्रकारच्या दुरूस्त्या दाखवत डिपॅाझीट गिळंकृत कारायचे असे कृत्य शांताबाई चौगुले व संदीप चौगुले या जोडगोळीकडून सुरू आहे.
त्यांच्या या कृत्यामुळे बेरोजगार मागासवर्गीयांची फसवणूक झाली आहे
रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडिया(आठवले)पक्षा च्या वतिने केलेल्या आंदोलनात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर जोरदार घोषनाबाजी करण्यात आली आंदोलनाची तिव्रता पाहून अधिक्षक रविंद्र आवळे यांनी चौकशी अहवाल मागवून घेवून कारवाई करण्यास लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन थांबवले दहा दिवसाच्या आत सिध्दराज बार आणी परमिट रुम चे लायसन रद्द न केल्यास जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पक्षाच्या महिला अघाडीच्या नेत्या रुपाताई वायदंडे यांनी दिला
.सदर चे आंदोलन हे रिपब्लीकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा.शहाजी कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
याआंदोलना मध्ये अक्षय साळवे,प्रदिप ढाले,खंडेराव कुरणे,संबोधी कांबळे,सलमान मोलवी,अमर दाबाडे,बाळासो कांबळे,प्रताप बाबर,गणेश माळगे,रनजीत हाळदीकर,वैभव सुतार,अमर तांदळे,कुनाल जगदने,संजय चव्हान,केदार बांदिवडेकर ,आनंद भामटेकर,बाबासो धनगर,बटू भामटेकर,सर्जेराव कांबळे, सतिश जाधव,विजय सकट,पुष्पा नलवडे,रुपाली कांबळे,छाया बाबर,संगीता चव्हाण यांच्यासह रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्यासंखेने उपस्थीत होते.
हॅाटेल सिध्दराज बिअर बार ला कुलूप लागलेच पाहिजे
|