बातम्या

हॉटेल व्हॅली व्ह्यू ग्रंडने अतिक्रमण केलेली जमीन घेतली ताब्यात

Hotel Valley View Ground took possession of the encroached land


By nisha patil - 11/29/2023 7:42:15 PM
Share This News:



पन्हाळा येथील हॉटेल व्हॅली व्ह्यू ग्रंडच्या मालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले होते,त्याचबरोबर पन्हाळा गडकोट किल्यावर केलेल्या अतिक्रमणाची गांभिर्याने दखल घेऊन या  जमिनीची शासकीय मोजणी करून केलेले अतिक्रमण तत्काळ काढावे. या मागणीचे निवेदन भारतीय दलित महासंघाच्या वतीने दि २३/१२/२०२२ रोजी पन्हाळा तहसीलदार यांना निवेदन देऊन  आमरण उपोषण करण्यात आले होते
 या पार्श्वभूमीवर   पन्हाळा तहसीलदार व पन्हाळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने पन्हाळा येथील हॉटेल व्हॅल्यू व्ह्यू  येथिल अतिक्रमणात येत असते त्यालेली जमीन ताब्यात घेण्यात आली ,पन्हाळा नगरपरिषदेच्या हद्दीतील सि. स .नंबर ६५२ चे क्षेत्र शासकीय सि. स .नं  ६४९ मधुन ३५५ . ०० चौ मी 
शासकीय मोजणी नुसार मोजणी करून ,जेसीबीच्या साहाय्याने  त्या जमिनीचे अतिक्रमण  काढण्यात आले. 

 याच बरोबर संबंधित वनविभाग व पुरातत्त्व विभाग यांच्याकडून देखील हॉटेलमध्ये येत असलेल्या ऐतिहासिक बुरुजाचेही अतिक्रमण हटवावे व  गडप्रेमी पर्यटक यांच्यासाठी  तो खुला करावा अशी मागणी भारतीय दलित महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष  श्रीकांत कांबळे यांनी केली 

यावेळी पन्हाळा नगर परिषदेची प्रशासकीय अधिकारी अमित माने ,विश्वास रामाने, पन्हाळा मंडल अधिकारी जे आर गोन्सालवीस, मदतनीस दामुअण्णा कांबळे , भारतीय दलित महासंघ चे सदस्य ,अमोल कांबळे, दयानंद शिवजातक,तुषार कांबळे, अमोल देसाई, राजू पाटील,उपस्थित होते


हॉटेल व्हॅली व्ह्यू ग्रंडने अतिक्रमण केलेली जमीन घेतली ताब्यात