बातम्या
विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील हॉटेल आणि बार रात्री अकरा वाजता बंद करण्याचे आदेश
By nisha patil - 10/22/2024 6:47:41 PM
Share This News:
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील हॉटेल, बार, दारू दुकाने, परमिट रूम, आणि धाबे रात्री अकरा वाजता बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी निवासी उपजिल्हाधिकारी संचय तेली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रभावित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूचे वाटप आणि भोजनाचे आयोजन करण्यात येते, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन, आदर्श आचारसंहितेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या परिस्थितीला आळा घालण्यासाठी हे निर्बंध लागू केले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील हॉटेल आणि बार रात्री अकरा वाजता बंद करण्याचे आदेश
|