बातम्या

आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?

How beneficial are coffee and chocolate for health


By nisha patil - 1/19/2024 7:30:49 AM
Share This News:



 मूड चांगला असेल तर चॉकलेट आणि चांगला नसेल तरी चॉकलेट. प्रेमापासून ते प्रपोज करण्यापर्यंतचा प्रवास चॉकलेटनेच सुरु होतो. हेच कॉफीबाबत सांगता येईल .

तर तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कॉफी पिण्याचे कोणतं ना कोणतं कारण असतं. पण तुम्हाला माहित आहे का की, चॉकलेट आणि कॉफी आणि शरिरीसाठी किती फायदेशीर आहे? किंवा शरिरासाठी किती घातक आहे? तुम्हाला यापैकी एक किंवा दोन्ही गोष्टींचे व्यसन लागले असेल तर ते तुमच्यासाठी घातक ठरु शकतं. एखाद्या व्यक्तीला 4 कप कॉफी प्यायल्यानंतर जेवढे कॅफिन मिळते. तेवढेच 7 चॉकलेट खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला कॅफीन मिळते.

कॉफी पिण्याचे फायदे

कॉफीमध्ये कॅफिन असते. कॅफिनमुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय एक कप कॉफीने थकवाही दूर होतो. कॉफी प्यायल्याने शरीरातील चयापचय दर 10 टक्क्यांनी वाढतो, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.

चॉकलेट खाण्याचे फायदे

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडते. डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट, मिल्क चॉकलेट असे अनेक प्रकारची चॉकलेट्स बाजारात उपलब्ध आहेत. डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर इत्यादी घटक असतात. पण काही चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमचे हृदयही निरोगी राहते कारण डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्तप्रवाह सुधारतो. चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन मेंदूतील एंडोर्फिनची पातळी वाढवण्यासाठी प्रभावी आहे.

चॉकलेट शरिरासाठी घातक

चॉकलेट जर अतिप्रमाणात खाल्ले तर पोटासाठी खूप हानिकारक ठरु शकते. ज्यांना नेहमी अॅसिडची समस्या असते त्यांच्यासाठी चॉकलेट धोकादायक मानले जाते. यामध्ये कॅफीन आणि थिओब्रोमाइनसारखे पदार्थ असतात, ज्यामुळे अॅसिडचे कारण ठरु शकतात. तसेच यामध्ये फॅटचे प्रमाण देखील भरपूर असतात, ज्यामुळे ऍसिड तयार होते.

कॉफी

काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिण्याची सवय असते. काही लोक ऑफिसमध्ये जाऊन कॉफी घेतात. रात्री झोपण्यापूर्वी मित्रांसोबत गप्पा मारणे, व्यायाम करणे आणि कॉफी पिणे. तुम्ही किती कॉफी पितात याचा विचार केला तर तुमच्या आरोग्यावर किती अन्याय होतोय हे लक्षात येईल. दिवसभरात एक कप कॉफी किंवा चहा पिणे चांगले. पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. कारण कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफिनच्या सेवनामुळे गॅस्ट्रिक ऍसिड स्राव वाढतो. ज्यामुळे अॅसिडिटी होते. त्यामुळे कधीही रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नका.


आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?