बातम्या

पाडव्याला विशेष महत्त्व असलेली साखरेची गाठ कशी तयार होते? चला बगूया

How is the sugar lump


By nisha patil - 3/29/2024 7:22:59 AM
Share This News:



घटक

1 वाटी साखर
1/2 वाटी पाणी
2 चमचे साजूक तूप
थोडासा दोरा
2 चमचे दूध

कृती . 
प्रथम कढईमध्ये एक वाटी साखर घेणे व त्यात अर्धी वाटी पाणी घालणे व मध्यम आचेवर पाक करण्यास ठेवणे

पाकाला उकळी आल्यावर त्यात दोन चमचे दूध घालणे दूध घातल्यावर पाकातील मळी वर येईल ती चमच्याच्या साह्याने काढून घ्यावी नंतर पाच ते सहा लहान वाट्या घ्याव्या त्यांना थोडं तूप लावून वाट्यांमध्ये दोरा सोडावा तो दोरा नीट एक सारखा करून घ्या मी वाट्या न वापरता जी कागदाचे छोट्या वाट्या असतात त्या वापरल्या आहेत

पाक मध्यम आचेवर एक सारखा ढवळत राहणे नंतर एक वाटी घेऊन वाटीवर पाकाचा एक थेंब टाकून बघणे तो जर पसरला नाही तर पाक आपला तयार आहे असे समजावे

नंतर पाकात एक चमचा तूप घालावे व पाक चांगला मिक्स करून घ्यावा व गॅस बंद करणे काहीजण पाकात सोडा खार घालतात मी तो न घालता त्यात तूप घातले आहे

नंतर आपण तयार केलेल्या वाट्यांमध्ये पाक काढून घ्यावा व वीस-पंचवीस मिनिटं थंड होण्यास ठेवून देणे थंड झाल्यावर कागदी वाटर मधून साखरेची माळ बाहेर काढून घेणे


पाडव्याला विशेष महत्त्व असलेली साखरेची गाठ कशी तयार होते? चला बगूया