बातम्या

हिवाळ्यात किती वेळ पायी चालणं ठरू शकतं फायदेशीर

How long can walking be beneficial in winter


By nisha patil - 12/25/2023 7:27:36 AM
Share This News:



पायी चालणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे आता जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. हृदयरोग, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर अशा कितीतरी समस्या पायी चालण्याने दूर होतात. पण हिवाळा येताच बरेच लोक थंडीमुळे पायी चालणं कमी करतात.

बऱ्याच लोकांनी थंडीच्या दिवसात सकाळी झोपेतून उठणं शक्य होत नाही. तर काही लोकांना सकाळी गरमागरम ब्लॅंकेटमधून बाहेर पडून चालण्याचा आळस येतो. तर काही लोक थंडीपासून वाचवण्यासाठी पायी चालायला जाणं टाळतात.

हिवाळ्यात पायी चालावं?

रोज नियमितपणे पायी चालणं आपल्या आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे सगळेच मान्य करतील. याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासोबतच हृदय आणि मेंदूचं आरोग्यही चांगलं राहतं. यामुळे शरीरही गरम राहतं. वजन कमी कऱण्यासही मदत मिळते. त्यासोबतच महत्वाची बाब म्हणजे ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं.

फक्त हिवाळ्यात पायी चालायला जाणाऱ्या लोकांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसे की, योग्य कपड्यांची निवड. हिवाळ्यात वॉकला जात असताना शरीर व्यवस्थित झाकून बाहेर पडा. यासाठी चांगले गरम कपडे वापरा आणि सॉक्सही घाला.

दुसरी बाब म्हणजे या दिवसात एकाएकी वेगाने चालणं किंवा जोरात धावणं करू नका. घरातून निघाल्यावर हळूहळू वॉकला सुरूवात करा. नंतर काही वेळाने चालण्याचा किंवा धावण्याचा वेग वाढवू शकता.

काही लोकांसाठी हिवाळयात सकाळी लवकर उठणं शक्य होत नाही. अशात तुम्ही सकाळी 8.30 ते 9.30 किंवा सायंकाळी 5 ते 6 दरम्यान वॉकला जाऊ शकता. यावेळी थंडी कमी असते. काही लोकांना हिवाळ्यात वॉक करण्यास मनाई केली जाते. जर हृदयासंबंधी समस्या असेल, अस्थमा किंवा निमोनिया असेल तर सकाळी वॉक करू नका. तसेच वयोवृद्ध लोकांनीही सकाळी वॉक करणं टाळावं.

हिवाळ्यात कितीवेळ पायी चालावं?

तसे तर एक्सपर्ट्स दररोज 10 हजार पावलं पायी चालण्याचा सल्ला देतात. पण बिझी शेड्यूलमुळे दररोज पायी चालण्याचा काउंट ठेवणं सगळ्यांना शक्य होत नाही. अशात हिवाळ्यात तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस अर्धा तास पायी चालण्याचा प्रयत्न करावा.


हिवाळ्यात किती वेळ पायी चालणं ठरू शकतं फायदेशीर