बातम्या

दररोज किती कॅलरीज बर्न कराल? शरीराला किती प्रमाणत असते त्यांची गरज, पाहा सोपं गणित

How many calories do you burn per day


By nisha patil - 1/25/2024 7:48:44 AM
Share This News:



 'समोसा छान वाटतोय... चव पण छान आहे...', पण यामध्ये कॅलरी खूप असतील. 'चिकन बिर्याणी नको, त्यापेक्षा ग्रिल्ड चिकनखाऊ', कॅलरी कमी असतील ही अशी वाक्य तुम्ही अनेकांकडून अनेकदा ऐकली असतील.

हल्लीच्या दिवसांमध्ये ही अशी वाक्य जरा जास्तच ऐकायला मिळतात. त्यामागचं कारण ठरतंय ती म्हणजे सध्याची विचित्र जीवनशैली.

सततचं काम, कामाचा ताण, अपेक्षांचं ओझं आणि जबाबदाऱ्या या साऱ्यामध्ये नकळतच खाण्यापिण्याच्या (Eating Habits) सवयी 360 अंशांनी बदलल्या आहेत ही बाप आपण नाकारू शकत नाही. सध्या stress eating चं प्रमाण प्रचंड वाढलं असून, कधीकधी उपाशी राहून अचानकच भूक लागल्यावर वारेमाप खाणाऱ्यांचा आकडा या दिवसांमध्ये मोठा असून, याचेच परिणाम स्थूलता आणि तत्सम समस्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. जेव्हा याबाबतचा धोका जाणवू लागतोय तेव्हाच ही मंडळी कॅलरी, फॅट्स (Fats) आणि या अशा अनेक गोष्टींबाबत सजग होताना दिसत आहेत.

सर्वांना परवडणारी Swift आता नव्या रुपात; कधी होणार लाँच, किती असेल किंमत? पाहून घ्या

आरोग्यदायी जीवनाच्या वाटेवर निघालेल्या अनेकांनीच शरीरासाठी महत्त्वाचं असणारं कॅलरीचं गणित समजून घेणं तितकंच महत्त्वाचं. दर दिवशी एखाद्या व्यक्तीच्या शरीराला किती कॅलरींची गरज असते आणि त्यांनी किती कॅलरी बर्न करणं अपेक्षित असतं हे त्यांचं वय, लिंग, वजन, उंची आणि त्यांच्या दिनचर्येवर आधारित असतं. यामध्ये शारीरिक मेहनतीचं कामही ग्राह्य धरलं जातं.

कॅलरी म्हणजे काय?

तुम्ही दर दिवशी किती अन्नग्रहण करता, त्यातून तुमच्या शरीराला किती उर्जा मिळते या साऱ्याला एकत्रितपणे कॅलरी असं म्हणतात. सोप्या भाषेत शरीराला मिळणाऱ्या उर्जेला मोजण्याचं परिमाण आहे कॅलरी. आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते महिला आणि पुरुषांना विविध प्रमाणात कॅलरीची आवश्यकता असते.

महिला 

महिलांसाठी शरीराला दर दिवशी 1,800 ते 2,400 कॅलरींची आवश्यकता असते. तर, त्यांनी दर दिवशी 1,800 ते 2,200 कॅलरी बर्न करणं अपेक्षित असतं.

पुरुष 

एका पुरुषानं दर दिवशी 2,500 ते 3,000 कॅलरी बर्न करून त्यांच्या शरीलाला 2,200 ते 3,000 कॅलरींची आवश्यकता असते. कॅलरीची ही गरज त्यांना विविध प्रकारच्या अन्नपदार्थांतून भागवता येऊ शकते.


दररोज किती कॅलरीज बर्न कराल? शरीराला किती प्रमाणत असते त्यांची गरज, पाहा सोपं गणित