बातम्या
किती तासांची ‘झोप’ तुमच्यासाठी आवश्यक ; जाणून घ्या
By nisha patil - 3/18/2024 7:30:31 AM
Share This News:
शरीराला व्यवस्थित झोप मिळाली नाही तरी तुमचे आरोग्य बिघडू शकते. आरोग्यासाठी झोप ही अत्यंत महत्वाची आहे. आपल्या दैनंदिन जीवनावर झोपेचा खूप मोठा परिणाम होत असतो. झोप पुरेशी मिळाली नाही तर त्याचे अनेक परिणाम दिसून येतात. आपल्या वयानुसार झोपेची गरज वेगवेगळी असते, अमेरिकाच्या नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या एका संशोधनात ही महिती देण्यात आली आहे. कोणत्या वयासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे, याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
० ते ३ महिने वयाच्या बालकांना १४ ते १७ तासांची झोप आवश्यक असते. ४ ते ११ महिने वयांच्या बाळांसाठी १२ ते १५ तास झोप आवश्यक आहे. तर १ ते २ वर्ष वयाच्या मुलांना ११ ते १४ तास झोप मिळाली पाहिजे. तसेच वय ३ ते ५ वर्ष असलेल्या मुलांनी १० ते १३ तास झोपले पाहिजे. ३ ते १३ वर्ष असलेल्या मुलांना ९ ते ११ तास झोप मिळाली पाहिजे. तर १४ ते १७ वर्ष वयाच्या मुलांनी ८ ते १० तास झोप घेतली पाहिजे. १८ ते ६४ वर्ष वयोगटातील व्यक्तींनी ७ ते ९ तास घ्यावी. तसेच ६४ वर्षांपेक्षा मोठा व्यक्तींनी ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे. मात्र, अलिकडे टीव्ही, व्हिडिओ गेम, संगणक, स्मार्ट फोन यामुळे मुले रात्री उशीरापर्यंत जागतात. त्यामुळे मुलांमध्ये अनेक समस्या दिसून येतात. मुलांसोबतच पालकांवर या वस्तूंमुळे परिणाम झाल्याचे दिसून येते.
किती तासांची ‘झोप’ तुमच्यासाठी आवश्यक ; जाणून घ्या
|