बातम्या

दिवसभरात किती मनुका खाव्यात?

How many raisins to eat in a day


By nisha patil - 3/11/2023 7:13:31 AM
Share This News:



कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच खावी असं आपले पूर्वज म्हणायचे. मनुका या आरोग्यासाठी लाभदायक असली तरी अतिप्रमाणात मनुका खाल्ल्याने अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.


मनुका आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. यात आयर्न, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम आणि कॉपरसारखे अनेक पोषकतत्वे असतात. मनुका खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो आणि पाचनशक्तीही मजबूत होते. मात्र मनुक्याचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा ते योग्य प्रमाणात आणि मात्रेत खावे लागतात. अतिप्रमाणात मनुका खाणे महागात पडू शकते. एका दिवसात किती मनुका खाव्यात आणि अतिप्रमाणात मनुका खाल्ल्याने शरीराला काय नुकसान होऊ शकते, हे सविस्तर जाणून घेऊया.

एका दिवसात किती मनुके खावेत याचे कोणतेही निश्चित प्रमाण नाही. पण साधारणपणे, दिवसभरात अर्धा कप ते एक कप मनुका खाणे आरोग्यासाठी पर्याप्त आहे. म्हणजे सुमारे 25 ते 50 ग्रॅम मनुके खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र त्या पेक्षा जास्त मनुका खाणे हानिकारक ठरू शकते. कर्बोदके, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक मनुकामध्ये आढळतात. पण मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅलरीज वाढू शकतात. त्यामुळे एका दिवसात 50 ग्रॅमपेक्षा जास्त मनुके खाऊ नयेत. गर्भवती महिला आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कमी प्रमाणात कमी मनुके खावेत.

वजन वाढू शकते

मनुका अधिक प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. कारण कॅलरी जास्त प्रमाणात इनटेक केल्या जातात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी

मनुक्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असतो. जो मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी मर्यादित प्रमाणातच मनुका सेवन करावे, अन्यथा ते त्यांच्यासाठी हानिकारक ठरु शकते.

श्वास घेण्यास त्रास

अतिप्रमाणात मनुके खाल्ल्याने अॅलर्जीसारखी परिस्थीती निर्माण होऊ शकते. ज्यामुळं श्वसनाचा त्रास निर्माण होऊ शकतो.

पोटासंबंधी विकार

मनुकामध्ये फायबर आणि फ्रक्टोज सारखे पदार्थ जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे पचनसंस्थेवर दबाव येतो. मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि पेटके यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय मनुकामध्ये असलेल्या साखरेमुळे पोटाशी संबंधित समस्याही होऊ शकतात.


दिवसभरात किती मनुका खाव्यात?