बातम्या
उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावे….
By nisha patil - 3/16/2024 7:19:45 AM
Share This News:
जीवाची लाही लाही करणारे उन्ह, आणि शरीरात होणारी पाण्याची कमतरता, कशी भरून काढावी या साठी आपल्याकडे अनेक उपाय सांगितले जातात. जसे विविध प्रकारचे सरबते थंड पेय आणि बाजारात उपलब्ध असणारे अनेक प्रकरचे कोल्ड्रिंक….पण कतीही बाहेरचे पेये घेतली तरी पाण्याची तहानही पाण्यानेच मिटवता येते, आणि याच पाण्याचे योग्य प्रमाण किती असावे याचे प्रमाण आपण नेहमी शोधत असतो.
दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्यावं हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र ते कशा तऱ्हेनं प्यावं याबाबत आयुर्वेदात काही पद्धती सांगितल्यात.
पाणी शरीरासाठी किती महत्त्वाचं हे आपल्याला माहिती आहे. दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्यावं असं सांगितलं जातं. आपण शरीराला लागणारं पुरेसं पाणी तर पितोय मात्र ते योग्य तऱ्हेनं पितोय का?. आयुर्वेदात पाणी पिण्याच्या काही पद्धती सांगितल्यात.
सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या
रात्री 7 ते 8 तासांची झोप घेतल्यानंतर सकाळी शरीराला हायड्रेट करणं गरजेचं आहे. त्यासाठी सकाळी उठल्यानंतर सुरुवातीलाच एक ग्लास पाणी प्यावं.
थंड पाण्याऐवजी गरम पाणी प्यावं
सकाळी पाणी पिताना थंड पाणी पिणं टाळा. त्याऐवजी कोमट पाणी प्या. फक्त सकाळीच नव्हे, तर इतर वेळीही गरम पाणी पिणं फायदेशीर आहे. थंड पाण्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतात.
जेवताना अति पाणी पिऊ नका.
पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी जेवताना अति पाणी पिणं टाळा. पाण्याचे काही घोट घेणं ठिक आहे. मात्र पोट भरेल असं पाणी पिऊ नका. जेवणाच्या 30 मिनिटं आधी किंवा जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या.
व्यायाम करतानाही पाण्याचं महत्त्वं
व्यायाम करताना अधिक प्रमाणात घाम येतो. त्यामुळे व्यायामाच्या 15 ते 30 मिनिटं आधी एक ग्लास पाणी प्या. तर व्यायामा करतानाही मध्ये मध्ये पाण्याचे काही घोट घ्या. तसंच व्यायाम झाल्यानंतरही पुरेसं पाणी प्या.
लिंबू रस टाकून पाणी प्या
पाण्यात लिंबाचा रस एकत्र करून प्यायल्यानं शरीरामार्फत परिणामकारकरित्या शोषलं जातं. लिंबाव्यतिरिक्त तुम्ही आल्याचा रसही टाकून पाणी पिऊ शकता.
उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावे….
|