बातम्या

टेन्शन फ्री कसं व्हायचं? अगदी सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स

How to be tension free


By nisha patil - 6/27/2023 7:32:03 AM
Share This News:



 सध्याचं धावपळीचं आयुष्य, कौटुंबिक जबाबदारी, अभ्यासाचं ओझं, आर्थिक समस्या आणि हृदयविकार अशा समस्यांमुळे ताण अटळ असतो आणि त्यामुळे आपलं शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं. ताणतणावामुळे आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स बदलतात आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागते.

ताण घेतल्याने समस्या सुटत नाही, त्यामुळे त्याची काही लक्षणे ओळखून त्यावर मात करण्यासाठी उपाय योजना करा. बदलत्या काळानुसार लोकांची तणाव व्यवस्थापन क्षमता कमी होत चालली आहे आणि माणसे चिडचिडे होतायत.

तणाव वाढला की शरीर कसं प्रतिसाद देतं ?

काम करण्याची इच्छा होत नाही.
पोटात गडबड होते.
लैंगिक इच्छा कमी होणे.
वारंवार डोकेदुखी.
पाठदुखी.
फास्ट श्वास घेणे.
मेमरी लॉस.
टेन्शन फ्री राहण्याचे सोपे उपाय

सर्वप्रथम तणावाचे कारण शोधा.
समस्यांपेक्षा उपायांवर अधिक भर द्या.
काही दिवस कामातून विश्रांती घेणे योग्य ठरेल.
सुट्टीवर जा.
स्वत:ला समजून घेण्यासाठी वेळ काढा.
जे तुम्हाला आनंद देईल ते करा.
मेडिटेशनचा आधार घ्या.
प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवा.
जीवनाला मौल्यवान मानून जीवनापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही, असे मानणे.
कमीत कमी मसालेदार आणि तेलकट पदार्थ खा.


टेन्शन फ्री कसं व्हायचं? अगदी सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स