सूर्यनमस्कार कसे करावेत

How to do Surya Namaskar


By nisha patil - 5/26/2023 6:47:32 AM
Share This News:



सूर्यनमस्कार–योगाचा एक परिपूर्ण व्यायाम :
स्वस्थ राहण्याची इच्छा आहे पण त्याच्यासाठी वेळ कमी पडतोय? ह्या परिस्थितीवर मात करायची असेल तर त्याचं उत्तर एकच:सूर्यनमस्कार,जो १२ योगासनाचा संच आहे,जो तुमच्या ह्र्द्य आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता राखू शकतो.सूर्यनमस्काराची आसने केल्याने तुमच्या शरीराला डौल येतो आणि मन शांत रहाते.

 

सूर्यनमस्कार करण्यासाठी उत्तम वेळ सकाळी,रिकाम्या पोटी.या साध्या आणि प्रभावी सूर्यनमस्कारांने आपण

स्वस्थ जीवनाची सुरुवात करूया.

 

प्रत्येक सूर्यनमस्कार हा दोन सूर्यनमस्कारांचा संच असतो.ही १२ आसने म्हणजे अर्धा सूर्यनमस्कार,आणि दुसरा अर्धा भाग म्हणजे ह्याच १२ आसनांची अनुक्रमाची पुनरावृत्ती करणे.फक्त डाव्या पाया ऐवजी उजवा पाय पुढे आणणे.( खाली चौथ्या आणि नवव्या क्रमामध्ये सांगितल्याप्रमाणे).तुम्हाला सूर्यनमस्काराचे विविध प्रकार दिसतील.पण एकाच पद्धतीच्या अनुक्रमाचा अभ्यास केल्याने त्याचे जास्त फायदे होतात.

 

सूर्यनमस्कार हे उत्तम स्वास्थ्याबरोबरच ज्या सूर्यदेवतेमुळे पृथ्वीवरील आपले अस्तित्व टिकऊन ठेवता येते त्या सूर्यदेवते प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतात.पुढील १० दिवस तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्य

देवाच्या  ऊर्जेविषयी कृतज्ञता व्यक्त करून करा. तुम्ही सूर्य नमस्काराचे १२ फेऱ्या करा, आणि त्यानंतर काही योगासने करून योग निद्रा मध्ये  गाढ विश्राम करा.तुम्हाला जाणवेल की स्वस्थ रहाण्यासाठी हा तुमचा मंत्र आहे.तोच मंत्र ज्याचा प्रभाव दिवसभर तुम्हाला जाणवेल.


सूर्यनमस्कार कसे करावेतspeednewslive24#