बातम्या

भेसळयुक्त तूप कसं ओळखावं; 'या' टीप्समुळे फसवणूक टळू शकते

How to identify adulterated ghee


By nisha patil - 11/10/2023 7:40:17 AM
Share This News:



तूप…
आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. तूपामुळे शरिराला अनेक फायदे होतात. स्किन हेल्दी राहते शिवाय तुमची पचनशक्ती सुधारते. तूपामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते.

पण हेच तूप जर भेसळयुक्त असेल तर मात्र त्याचे दूरगामी परिणाम तुमच्या शरिरावर होतात. बाजारात विविध कंपनीचं तूप विकल्या जातं. शुद्ध तुपाच्या नावाखाली अनेकदा भेसळयुक्त तूपाची विक्री केली जाते. पण मग आपण शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप कसं ओळखायचं? आपली फसवणूक कशी टाळायची? यासाठी आम्ही ही बातमी विस्ताराने देत आहोत.

भेसळयुक्त तूप कशापासून बनतं?

वनस्पती तूप आणि तिळाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करत हे भेसळयुक्त तूप बनवलं जातं. यामुळे अशुद्धाला चिकटपणा येतो. या तूपालाही शुद्ध तुपासारखाच वास असतो. चवही अगदी तशीच असते. हे बनावट तूप शुद्ध तूपाच्याच किमतीलाच विकलं जातं. पण असं बनावट तूप खाल्ल्यास त्याचा शरिरावर परिणाम होतो. हृदयविकार आणि पक्षाघातासारखे आज होऊ शकतात.


भेसळयुक्त तूप कसं ओळखावं; 'या' टीप्समुळे फसवणूक टळू शकते