बातम्या
कशी बनवायची कोफ्ता करी?
By nisha patil - 9/24/2023 9:27:17 AM
Share This News:
साहित्य :बटाटे पाव किलो, गाजर पाव कि., वाटाणा पाव कि., कच्चे केळे पाव कि., फरसबी पाव कि. फ्लॉवर पाव कि., आले एक लहान तुकडा, चवीनुसार हिरवी मिरची, मीठ, कांदा पाव कि., लिंबू एक, कोथिंबीर, तेल.
करीसाठी साहित्य :धणे 4 ते 5 चमचे, कांदे पाव कि., टोमॅटो पाव कि., आले, गरम मसाला, दोन ते अडीच चमचे तूप, किंवा तेल, क्रिम दोन कप.
कोफ्ता कृती : बटाटा व केळे उकडून साल काढून स्मॅश करा. इतर भाज्या ब्लांच करुन तुकडे करा. सर्व मसाला वाटून घ्या. भाज्या व मसाला मिसळून त्याचे गोळे करुन तळा.
करीची कृती : थोडे तूप गरम करुन कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आले, लसूण वाटून घ्या. व त्यात घालून परतवा. धणे भाजून वाटून ते पण वरील मिश्रणात मिसळून परतून घ्या. टोमॅटोचे तुकडे करुन ते परतून घ्या. तूप सुटेपर्यंत सर्व शिजवा. दीड ते दोन कप पाणी घालून उकळून घ्या. मीठ घाला. वरील कोफ्ते घालून उकळवा. फेटलेले क्रिम घालून चांगले मिसळून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
कशी बनवायची कोफ्ता करी?
|