बातम्या

तणाव व्यवस्थापन कसे करावे?

How to manage stress


By nisha patil - 1/11/2023 7:14:27 AM
Share This News:



ताण… आजच्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक. ताण कधी कळतो, जाणवतो तर कधी लक्षात येत नाही. ताण व्यक्ति व्यक्ति प्रमाणे बदलत जातो. ताण ओळखता आला, स्वीकारला आणि त्यावर काम केले की तो कमी होतो, नाहीसा होतो.

ताण निर्माण होण्याची विविध कारणं असू शकतात. आज आपण ताणाची लक्षणं, कारणं आणि ताणाचे नियोजन करण्यासाठी चे उपाय बघणार आहोत.

भावनिक बदल
1. चिंता : कायम कशाची तरी चिंता, काळजी करत राहणे.
2. चिडचिड : छोट्या छोट्या कारणांवरून वैतागणे, चिडणे, पटकन राग येणे, चिडचिड होत रहाणे.
3. लहरीपणा वाढणे : आनंद,दु:ख दोन्ही प्रसंगात फार पटकन मूड बदलणे, पटकन चिडणे आणि लगेच शांत होणे.
4. लक्ष केंद्रित करताना अडचणी येणे : कोणत्याही गोष्टीवर कामावर लक्षकेंद्रित करताना अडचण येणे. कामात, लक्ष न लागणे, निर्णय घेताना मूळ मुद्द्यांवर विचार न करता येणे.
5. नकारात्मक विचार : स्वतःविषयी,
स्वतःच्या क्षमतांबाबत नकारात्मक विचार येणे, आपल्या आजुबाजूला असलेल्या लोकांबद्दल नकारात्मक विचार येणे, प्रत्येक गोष्टीत नकारात्मक प्रतिक्रिया असणे.
6. समाजापासून दूर रहाणे : सामाजिक समारंभ टाळणे, एकटं राहणं पसंत करणे.
7. व्यसनांचा वापर वाढणे : व्यसन लागणे, व्यसनाचा आधार घेणे. व्यसन केल्यावर ताण कमी झाला असे वाटणे.

ताणाची लक्षणे:
शारीरिक लक्षणे/ शारीरिक बदल:
1. स्नायूंमध्ये वेदना- अवघडलेपण जाणवणे : मान, खांदे आणि पाठीमधील स्नायूंमध्ये वारंवार वेदना, अवघडल्यासरखे होणे. हालचाल करताना सहजपणा न वाटणे.
2.वारंवार होणारी डोकेदुखी : वारंवार डोके दुखणे, मायग्रेनचा त्रास होणे.
3. झोप विस्कळीत होणे : झोप न लागणे.
झोपून उठल्यावर प्रसन्न न वाटणे.
4. थकवा : कायम थकवा जाणवणे. प्रसन्न-ताजेतवाने न वाटणे. मानसिक शारीरिक थकवा जाणवत राहणे.
5. पचन समस्या : वारंवार अपचन होणे, पोटात दुखत राहणे. पोट साफ न होणे. वारंवार पित्ताचा त्रास होणे.
6. छातीत धडधड होणे : छातीत धड धड होत आहे असे वाटत राहणे.
7. भुकेमध्ये बदल होणे : भूक न लागणे, खाण्याची इच्छा न होणे किंवा खूप भूक लागणे, सतत काहीतरी खात रहावे असे वाटणे. आपण काय खातो किती खातो याचा अंदाज न येणे.
8. प्रतिकार शक्ती कमी होणे : वारंवार आजारी पडणे, आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी वेळ लागणे. वातावरणातील छोट्या छोट्या बदलांचा शरीरावर व तब्बेतीवर लगेच परिणाम होणे.


तणाव व्यवस्थापन कसे करावे?