बातम्या

वजन वेगाने कमी करण्यासाठी जिऱ्याचा असा करा वापर, जाणून घ्या पद्धत!

How to use cumin to lose weight fast


By nisha patil - 3/9/2023 6:59:30 AM
Share This News:



 जिऱ्याने वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढते. सोबतच जिऱ्याचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. बरेच लोक जिऱ्याचा औषधी म्हणूनही वापर करतात. जिऱ्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे जिऱ्याच्या मदतीने तुम्ही वजनही कमी करू शकता.

चला जाणून घेऊ ते कसं?

जिऱ्यात फार कमी कॅलरी असतात. त्यासोबतच यात अॅँटी-इनफ्लेमेटरी गुणही असतात. याने मेटाबॉलिज्मही सुधारतं. जिऱ्यामध्ये थायमोक्विनोन नावाचं एक तत्त्व असतं. याने शरीरातील फ्री रॅडिक्लसवर हल्ला केला जातो आणि त्यांना शरीरातून बाहेर काढलं जातं.

एका रिसर्चनुसार, जर जिरं लिंबाच्या रसात मिश्रित करून सेवन केलं तर याने वजन कमी करण्यास मदत मिळते. जिरं किंवा जिऱ्यांचं पाणी सेवन केल्याने केवळ १५ ते २० दिवसात वजन कमी केलं जाऊ शकतं असा दावा अनेकजण करतात.

कसं होतं वजन कमी?

जिरं हे वेगाने कॅलरी बर्न करतं. असं करण्यासाठी जिरं मेटाबॉलिज्मची गती वाढवतं आणि पचनक्रियाही सुधारतं. जेव्हा पचनक्रिया चांगली होईल तेव्हा मेटाबॉलिज्म योग्य राहील. त्यामुळे याचा फायदा वजन कमी करण्यास होतो.

जिरं कसं वापराल?

१) २ चमचे जिरं घ्या आणि ते रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे जिऱ्याचं पाणी गाळून घ्या. या पाण्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि सेवन करा. हे पाणी रोज रिकाम्या पोटी २ आठवडे सेवन करा.

२) एक चमचा जिरं पावडर दह्यात मिश्रित करा आणि साधारण १५ दिवस जेवण केल्यावर याचं सेवन करा.

३) एक कप पाणी उकडून त्यात एक चमचा जिरं पावडर टाका. त्यात थोडा लिंबाचा रस टाका. हे ड्रिंक रोज २० दिवस जेवण केल्यावर सेवन करा. फायदा दिसेल.


वजन वेगाने कमी करण्यासाठी जिऱ्याचा असा करा वापर, जाणून घ्या पद्धत!