बातम्या

रणरणत्या उन्हामध्ये महायुतीच्या रॅलीला प्रचंड गर्दी

Huge crowd at Mahayuti rally in scorching summer


By nisha patil - 5/5/2024 4:48:29 PM
Share This News:



कोल्हापूर :लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापूर शहरात भव्य रोड शो आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्याला सहज भेटता येणे शक्य आहे अशा उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन केले. 
 

कोल्हापूर शहराचे श्रद्धास्थान राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या दसरा चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यानंतर या प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. 
 

महायुतीच्या या विशाल रॅलीमुळे संपूर्ण कोल्हापूर शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते. तसेच कोल्हापूरातील युवा वर्ग तसेच आबालवृद्ध या रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कोल्हापूर शहरातील दसरा चौक ते शिवाजी चौक अशी ही रॅली काढण्यात आली. यावेळी अब की बार चारसो पारचे नारे देण्यात आले. छत्रपती शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची यशस्वी सांगता करण्यात आली.
 

या रॅलीला संबोधित करताना  येत्या ७ मे रोजी आवर्जून मतदान करा असे कोल्हापूरकरांना आवाहन केले. बूथ लेव्हलला उत्तम काम झाले आणि जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर गेल्या वेळची लीड मोडून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. 
 

मी तिथे आलो की काहींच्या पोटात दुखायला लागतं, इथे येण्याची बंदी आहे का..? मी आजच इथे आलो नाही तर कोल्हापूरच्या महापुरात आणि कोरोना काळात देखील इथे येऊन मदत केली. आरोग्य मंत्री म्हणून केलेल्या मदतीमुळे तसेच कोल्हापुरात उद्भवलेल्या महापुरात रोगराई पसरली नाही. 
राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर शहराला सढळहस्ते निधी दिला. २४ कोटी गांधी मैदान, २० कोटी रंकाळा जीर्णोद्धार, ५० लाख शिवाजी चौकातील पुतळा सुशोभीकरण, ५५० कोटी पंचगंगेचे प्रदूषण रोखणे आणि ३२०० कोटी कोल्हापूरात पुन्हा पूर येऊ नये यासाठी तरतूद केल्याचे सांगितले. 
कोल्हापूरातील टोल मी बंद केला.

त्यासाठी सरकारकडून ८०० कोटी रुपये टोल कंपनीला दिले. मात्र आता भेटणारा खासदार निवडून देणे तुमची जबाबदारी आहे. भेटण्यासाठी तिकीट काढून टोल द्यावा लागणारा खासदार निवडू नका असे आवाहन केले. येत्या ७ मे रोजी महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. 
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच महायुतीचे कोल्हापूर शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रणरणत्या उन्हामध्ये महायुतीच्या रॅलीला प्रचंड गर्दी