विशेष बातम्या

भीमा कृषी पशू प्रदर्शनला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

Huge response from farmers to Bhima Agricultural Animal Show


By nisha patil - 2/24/2025 2:59:11 PM
Share This News:



भीमा कृषी पशू प्रदर्शनला  शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

गेल्या तीन दिवसात उच्चांकी खरेदी-विक्री

 प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी  शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर प्रचंड गर्दी झाली होती.गेल्या तीन दिवसात उच्चांकी तांदूळाची विक्री झाली आहे.आणि बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी विक्री झाली आहे.प्रदर्शन पाहण्यासाठी आणि खाद्य पदार्थांवर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर मेरी बेदर मैदानावर  गर्दी करत आहेत.

प्रदर्शनात पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा आणि चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण, आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू सहा फूट उंच आणि सात  फूट लांब आहे बैल (वळू),पाच वर्षाची देवणी गाय, साडेपाच वर्षांचे राम आणि रावण नावाचे दोन कंधारी वळू,आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर (मेंढी)सानेन शेळी खास आकर्षण ठरत आहेत.
 
आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. सकाळपासूनच शेतकरी व नागरिकांची गर्दी होत आहे.


भीमा कृषी पशू प्रदर्शनला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद
Total Views: 45